कार्यक्रम आणि उपक्रम
खुंटलेल्या संवादामूळे बिघडते मानसिक आरोग्य : समूपदेशनासाठी `आऊटलेट` ची भूमिका महत्वाची
– डॉ. रेखा साळुंखे
जळगाव : समाजात विभक्त कुटुंब पद्धतीची वाढती संख्या, अनुभवी जाणकार व्यक्तिंकडून मार्गदर्शन घेण्यास होणारे दुर्लक्ष, खुंटलेला संवाद यामुळे भावनांना, विचारांना योग्य `आऊटलेट` न मिळाल्यामुळे मासिक आरोग्य बिघडत आहे, अशावेळी समुपदेशकांची भूमिका महत्वाची ठरते, असे प्रतिपादन डॉ. रेखा साळुंखे यांनी ब्रह्माकुमारीज् मध्ये आयोजित समूपदेशन आणि मानसिक आरोग्य विषयावरील विद्यार्थी आणि शिक्षक शिबिरात केले.
`आऊटलेट` साठी संवाद :
ब्रह्माकुमारीज्तर्फे ढाके कॉलनी सेवाकेंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. रेखा साळुंखे, मानसशास्त्र विषयतज्ज्ञ, डी.डी.एस.पी. महाविद्यालय, एरंडोल यांनी समूपदेशन आणि मानसिक आरोग्य या विषयावर संवाद साधला. जागतिक स्तरावर प्रत्येक दहा व्यक्तिंमागे एक समूपदेशकाची आवश्यकता आहे याबाबत चिंता व्यक्त करतांना त्या पुढे म्हणाल्या की, पुर्वी असणा·या एकत्र कुटुंब पद्धतीत एकमेकांशी संवाद साधल्याने भावनिक आणि वैचारिक आदन-प्रदान व्हायच्या त्यामुळे आयुष्यातील ब·याच प्रश्नांची सोडवूणक व्हायची. आता मात्र याची कमतरता जाणवते. भावना आणि विचारांना वाट न मिळणे हे मानसिक रोग जडण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यासाठी समुपदेशकांची भूमिका महत्वाची ठरते.
समूदपेशना अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाचा पुढाकार :
–मनाला सशक्त करणे हीच विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय
-ब्रह्माकुमारी सुमनदीदी, माऊंट आबू
आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियानाचा शुभारंभ
जळगाव : आज सर्वत्र विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे याला कसे थांबविता येईल यावर समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत, अशावेळेस मनास सशक्त बनविणे हाच एकमेव उपाय आहे आणि तो सध्याच्या शिक्षण पद्धतीत आध्यात्मिक शिक्षणाचा समावेशानेेच पूर्ण होईल असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी सुमनदीदी, राष्ट्रीय संयोजक, शिक्षण प्रभाग, माऊंट आबू यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियान आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन येथील ढाके कॉलनी सेवाकेंद्रात आयोजि करण्यात आले. त्याप्रसंगी सुमनदीदी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, अगदी कोवळया वयातील विद्याथ्र्यांच्या आत्महत्येच्या घटना पाहता मन व्यथित होते, जीवनाचा प्रारंभ करण्यापूर्वीच त्याला न समजून घेता आत्महत्या करणा·या मुलांना कसे समजावे असा प्रश्न पालकांना पडलेला आहे. कमजोर मन असणे हे आत्महत्येचे सर्वांत मोठे कारण सांगता येईल, त्यासाठी शिक्षण पद्धतील प्रचलित विषयांबरोबर मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश असणे ज्या योगे मन सशक्त होईल हाच एक महत्वाचा उपाय आहे असेही त्या म्हणाल्यात.
अध्यक्षीय संबोधन करतांना प्राचार्य युवाकुमार रेड्डी, मणियार लॉ कॉलेज यांनी सांगितले की, अभियांते, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांची जशी समाजाला गरज आहे तसे मूल्यनिष्ठ नागरीक बनण्याचीही आहे आणि ब्रह्माकुमारीज् द्वारा आरंभ झालेले होत असलेले हे अभियान त्यासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य अतिथी प्रा. मानसी गगडानी, प्राचार्य, उज्ज्वल इग्लिश स्कूल, यांनी शिक्षणातील नवी प्रवाहां विषयी सांगितले. ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी यांनी उपस्थितांना राजयोगाची अनुभूती करविली. अभियानाचा उद्देश प्रा. विकास साळुंखे, नोडल सेंटर, नाशिक यांनी सांगितला. कु. खुशी यांनी स्वागत नृत्य केले. अभियानाचा अनुभव ब्र.कु. नरेशभाई, शिक्षा प्रभाग सदस्य, सिकर राजस्थान यांनी सांगितला. प्राचार्य डॉ. ममता शर्मा, विवेकानंद कला महाविद्यालय, अहमदाबाद यांनी शिक्षा प्रभागाचा उद्देश स्पष्ट केला. मूल्यशिक्षा अनुभव प्रकाश सोनवणे, यांनी कथन केला. मूल्यशिक्षणात उत्तीर्ण विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र वितरण या प्रसंगी करण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ. विजय पाटील, भगीरथ इग्लिश स्कूल, जळगांव यांनी केले. अभ्यासक्रमांचा परिचय पकंज पाटील यांनी करुन दिला. ब्रह्माकुमारी हेमलता यांनी सूत्रसंचलन केले.