कॉन्सिलिंग मधील करियरच्या संधी – डॉ. सोमनाथ वडनेरे

लेख |
कॉन्सिलिंग मधील करियरच्या संधी

– डॉ. सोमनाथ वडनेरे


* समुपदेशन  शिक्षणाचे महत्व
तुझ दुखणं मानसिक आहे … असे वारंवार कुणास म्हटले की, मानसिक शब्दाची भिती वाटू लागते. आज `मानसिक` शब्द विचित्र पण सहजतेने उच्चारला जात असल्याने त्याबद्दल वेगवेगळ्या भावना जुळल्या जातात.  प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेली स्पर्धा, कामाचा अतिरिक्त ताण, बदलत चाललेली जीवन शैली यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. शिवाय हातात आलेल्या स्मार्ट फोनद्वारे सोशल मीडियाच्या अविवेकी वापर सुद्धा यास कारणीभूत ठरत आहे. मनातील चलबिचल, घालमेल, चिडचिडेपणा, मूड ऑफ होणे, भिती, नैराश्य आदि समस्या मानसिक अस्वाथ्य किंवा अनारोग्य सदरात मोडतात. अशावेळी एका निपुण समुपदेशकाची आवश्यकता असते. जगात  शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, आय.टी. वा अन्य क्षेत्रातील व्यक्तिंची जितकी आवश्यकता आहे तितकीच समुपदेशकाची आहे. त्याअनुषंगाने समुपदेशनाचे महत्व लक्षात घेता, उत्तम समुपदेशनाचे शिक्षण देणा·या महाविद्यालये, विद्यापीठांची आवश्यकता जास्त प्रमाणात भासणार आहे. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील अग्रणी विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठानाच्या शिक्षण प्रभागाच्या मार्फत `समुपदेशन आणि मानसिक आरोग्य प्रगत पदविका` (Advance Diploma in Counselling and Mental Health)हा उपयुक्त अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे.

करियर म्हणजे केवळ पैसा कमविणे नव्हे :

एखादी चांगली पदवी अथवा नोकरी मिळविली म्हणजे करियर झाले असा समज ब·याच जणांचा असतो. आज करियर शिक्षण घेणे याकडे पैसा कमविणे या एकाच उद्देशाने पाहिले जाते. मात्र यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होतो याकडे बहुतांश लोकांचे दुर्लक्ष असते. तेव्हा करियरची निवड करतांना आपल्यातील छंदाला करियर बनविल्यास आपण यात निपुणता प्राप्त करु शकतो. आपण ठरविलेल्या क्षेत्रात योग्य शिक्षण प्राप्त केल्यास उत्तम करियर घडू शकते. योग्य अभ्यासक्रमामुळे आपले व्यक्तिगत जीवनमान सुधारते, मानसिक स्वास्थ्य मिळते, आपल्यातही सकारात्मक बदल घडतात.

समुपदेशातील करियरच्या संधी :

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपणातील समुपदेशनाचे कौशल्य प्राप्त होते. विविध संस्थांमध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी यामुळे निश्चित मिळतात. आपणाकडे एखादी पदवी असल्यास ज्या पदासाठी आपण अर्ज केलेला असेल त्याच्या जोडीस समुपदेशानातील प्रगत पदवीमुळे आपली शैक्षणिक पात्रता उजवी ठरते. केवळ नोकरीच्या संधीच नव्हे तर आपण एखाद्या नामांकित मनोविकार तज्ज्ञ, मनोसोपचार तज्ज्ञ,  वरीष्ठ समुपदेशक, यांचे कडे सहायक म्हणून काम करु शकतात.

अभ्यासक्रम कोण करु शकतो :
समुपदेशन आणि मानसिक आरोग्य प्रगत पदविका हा अभ्यासक्रम शिक्षक, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, जनसंपर्क अधिकारी, पत्रकार, समाजकार्य आणि समाजशास्त्राचे अभ्यासक, अशासकीय, सामाजिक संस्थांचे सभासद, कार्यकर्ते, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि इतर क्षेत्रातील काम करणारा आणि समुपदेशन करण्याची आवड असलेले सर्व हा अभ्यासक्रम करु शकतात.अभ्यासक्रमात काय असेल :
एक वर्षीय प्रगत पदविका अभ्यासक्रमामध्ये विविध घटकांवर मार्गदर्शन मिळणार आहे, त्यात समुपदेशनाची मूलभूत तत्वे, आरोग्य आणि कल्याणासाठी समुपदेशन, समुपदेशन आणि मानसिक आरोग्य, आरोग्य सेवा, आहार व प्रतिबंधनात्मक पद्धती, सुधारीत जीवन शैली, आदि विषयांवर मार्गदर्शन असून प्रात्यक्षिक कार्याचा भाग म्हणून समुपदेशनातील व्यावहारिक घटनांचा अभ्यास व सराव असणार आहे. थोडक्यात एका वर्षाच्या कालावधीत समुपदेशनातील मूलभूत संकल्पनाबरोबर अभ्यास आणि सराव देखील विद्याथ्र्यांना मिळणार असल्याने एक उपयुक्त अभ्यासक्रम म्हणून हा योग्य पर्याय आहे.

अभ्यासक्रमासाठी प्रवेश :
कुठल्याही विद्याशाखेचा पदवीधर यास प्रवेश घेऊ शकतो. अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश घेता येणार असून यासंबंधी या https://bkmahaeducation.com/ संकेतस्थळावर अभ्यासक्रमाची माहिती आणि प्रवेशासंदर्भातील सूचना उपलब्ध आहेत.

– डॉ. सोमनाथ वडनेरे
bksomnath@gmail.com | 9850693705
(लेखक हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे मीडिया शिक्षक आहेत. )


Tags

महत्वाची माहिती :

Tags

There’s no content to show here yet.