न्यूजलेटर- बीके शिक्षा वार्ता

न्यूजलेटर- बीके शिक्षा वार्ता


स्वस्थ्य एवं सशक्त भारतासाठी आध्यात्मिक शिक्षण 
विषयावर माऊंट आबू येथे शिक्षकांसाठी संमेलनाचे आयाजन
माऊट आबू : स्वस्थ्य एवं सशक्त भारतासाठी आध्यात्मिक शिक्षण विषयावर दि. 5 ते 9 सप्टेंबर, 2024 दरम्यान माऊंट आबू येथे राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठानच्या शिक्षण प्रभागाच्या वतीने भारतात शिक्षण क्षेत्रासाठी अनेकानेक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षण महासंमेलनाचे आयोजन होत असते. या वर्षी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्यालयी म्हणजेच माऊंट आबू येथे द. 5 ते 9 सप्टेंबर, 2024 दरम्यान स्वस्थ्य एवं सशक्त भारतासाठी आध्यात्मिक शिक्षण विषयावर राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जीवनात येणा·या संकटांच्या सामना करण्यासाठी आत्म सशक्तिकरण आणि उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक दिवसातील काही वेळ काढणे आवश्यक आहे. विश्व स्वास्थ्य संघटनाच्या मते आध्यात्मिकता आरोग्याचा चौथा स्तंभ आहे. आध्यात्मिक स्वास्थ्य कोणत्याही व्यक्तिच्या संपूर्ण विकासासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते.  यामुख्य विषयावर या संमेलनात भारतातील प्रसिद्ध शिक्षातज्ज्ञ विचार मंथन करतील.  संमेलनासाठी आपल्या स्थानिक सेवाकेंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सोमनाथ वडनेरे, माध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज् यांनी केले आहे.

प्रेस नोट / करियर वार्ता:
समूपदेशन आणि मानसिक आरोग्य विषयावर यचममुवि, नाशिक यांचा प्रगत पदविका अभ्यासक्रम
कॉन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांना रोजगाराची उत्तम संधी
…………. (दि.  ) जगात सर्वत्र मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्या लक्षात घेता प्रशिक्षण कॉन्सिलरची आवश्यकता आहे. हे महत्व लक्षात घेता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि शिक्षण प्रभाग, राजयोग शिक्षा आणि शोध प्रतिष्ठान यांच्या वतीने `समूपदेशन आणि मानसिक आरोग्य` विषयावर प्रगत पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या भाकिताानुसार पुढे येणा·या काळात जगातील प्रत्येक शंभर व्यक्तिमागे एक कॉन्सीलरची आवश्यता असेल. अशा वेळी प्रशिक्षीत समूपदेशन अर्थात् कॉन्सिलिंग करणा·या व्यक्तिंची फार गरज पडणार आहे. हे महत्व लक्षात घेता युवकांना, विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम पूर्ण करुन करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये या अभ्यासक्रमाची केद्रे आहेत. यासंबंधी अधिकची माहिती आपण www.bkmahaeducation.com या वेबसाईट वरुन घेऊ शकतात असे आवाहन महाराष्ट्र संयोजक प्रा. विकास साळुंखे आणि माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले आहे.


 

 


Tags

महत्वाची माहिती :

Tags